• Wed. May 14th, 2025

तृणमूल नेत्या महुआ मोईत्रा यांच्या घरावर सीबीआय छापे

Byjantaadmin

Mar 24, 2024

कोलकाता : ‘संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी’ लोकसभेतून निलंबित झालेल्या तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सीबीआयच्या पथकाने कोलकाता येथील घरावर व कृष्णनगर येथील अपार्टमेंटवर छापे मारले. सीबीआय अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची मोठी फौज होती. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांच्यावर केला जात आहे. याप्रकरणी सकाळपासून अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. ईडीने त्यांना याअगोदर १९ फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. महुआ यांना संसदेच्या नैतिक समितीने दोषी ठरवले होते, तर महुआ यांनी त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळले होते. तसेच आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे म्हटले होते.

मागील वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की, महुआ यांनी महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारले होते. लोकपालांनी आदेश दिल्यानंतर मोईत्रा यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. येत्या सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करावा, असे आदेश लोकपालने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *