• Mon. Jun 22nd, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांच्या हस्ते देवणी येथील न्यायालय इमारतीचे उद्घाटन

Byjantaadmin

Mar 23, 2024

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांच्या हस्ते देवणी येथील न्यायालय इमारतीचे उद्घाटन

लातूर, दि. 23 :  देवणी येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील होते.

न्यायमूर्ती श्री. पाटील आणि न्यायमूर्ती श्री. धोटे यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांनी इमारतीची पाहणी करून माहिती घेतली. तसेच न्यायमूर्ती श्री. पाटील आणि न्यायमूर्ती श्री. धोटे यांनी उपस्थित विधी अधिकारी, विधिज्ञ यांच्याशी संवाद साधला.

देवणीचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अतिष खोल्लम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जी. जी. क्षीरसागर, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *