निलंगा पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यवाही
निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून ट्रॅक्टरला पाठीमागे रिप्लेक्टर नसल्याने अनेक दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या पाठीमागे धडकून मयत व जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे यावर आवर बसावा म्हणून निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाही करून दंड वसूल केला.रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील बाजूस पोलीस कर्मचाऱ्यांनी रिफ्लेक्टर लावले. प्रत्येक ट्रॅक्टरला रिप्लेटर असल्यास अपघाताच्या प्रमाणात घट होणार असल्याने या कार्यवाहीबद्दल पोलीसकर्मचाऱ्याचे नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे. निलंगा शहरासह तालुक्यात गेल्या दोन महिन्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या पाठीमागील बाजूस धडकून मयत व जखमी झाले आहेत म्हणून निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून सहायक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बिरादार, पोहेकॉ संदीप कांबळे, होमगार्ड खंडू कांबळे, राठोड, स्वामी आदींनी रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावून त्यांच्यावर रिफ्लेक्टर न लावल्या बाबत दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ट्रॅक्टरच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविण्यात आले पोलीस प्रशासनाच्या या विशेष मोहिमेबद्दल नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे सदरची विशेष कार्यवाही मोहीम वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बिरादार यांनी बोलताना सांगितले.
