पुणे:-मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू झाला आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपाल कोश्यारींना का हटवले नाही, असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला चिचारला आहे. तर नुपूर शर्मांला एक राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे
मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू झाला आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपाल कोश्यारींना का हटवले नाही, असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला चिचारला आहे. तर नुपूर शर्मांला एक राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे.
ही शोकांतिका
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी वेचले, असे असताना शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
मोदी भेटीबाबत बोलणे टाळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उदयनराजेंची भेट झाली. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, हा प्रश्न विचारला असता उदयनराजे भोसले यांनी बोलण्याचे टाळले.
मोर्चात सर्वपक्षीय नेते
पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद, मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील
बंदला अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका म्हणाले होते, “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.” सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहतील.

महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंद पुकारण्यात आला आहे. बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग.

विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने शहरातील सर्व रस्त्या शुकशुकाट; दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

पुणे बंदमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

- मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
मोर्चात सर्वपक्षीय नेते
पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला
