माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक,धार्मिक उपक्रमांनी साजरा
लातुर प्रतिनिधी- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक २१ मार्च २०२४ रोजी लातूर शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक,धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला. तसेच शहरातील गावभागात असलेल्या सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली तर लातुर शहरातील विशाल नगरमधील साईबाबा मंदिर या ठिकाणी धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दुग्धाअभिषेक करण्यात आला.
रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणापूर येथील ग्रामदैवत माता रेणुका देवी मंदिरात सकाळी महाआरती व शहरातील महेबुब सुभानी दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली.लातुर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या माऊली रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले ज्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव,गोरोबा लोखंडे,विजयकुमार साबदे, संभाजी सूळ,दगडुसाहेब पडिले,दगडुअप्पा मिटकरी,ॲड.देविदास बोरूळे पाटील,प्रा.प्रवीण कांबळे,जालिंदर बर्डे,सुपर्ण जगताप,ॲड.सचिन पंचाक्षरी,शिवाजी कांबळे,ॲड.अंगदराव गायकवाड, संजय सूर्यवंशी,युनूस मोमीन,आयुब मणियार, दत्ताभाऊ सोमवंशी,तबरेज ताबोळी,सुंदर पाटील कव्हेकर,धनंजय शेळके,अविनाश बट्टेवार, भाऊसाहेब भडिकर,अभिजित इगे, बालाजी झिपरे,विष्णुदास धायगुडे,अभिषेक पतंगे,महेश कोळे,सुलेखाताई कारेपूरकर,अक्षय मुरुळे,जयदेव मोहिते,पिराजी साठे,बब्रुवान गायकवाड ,प्रमोद जोशी, राजू गवळी,संजय सुरवसे,किरण बनसोडे,अशोक सूर्यवंशी,करीम तांबोळी,निजामुद्दीन शेख,धनंजय गायकवाड,अमोल गायकवाड,आकाश मगर, धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार.प्रा.प्रविण कांबळे,सुपर्ण जगताप,शिवाजी कांबळे,ज्ञानोबा साखरे,सुरेश चव्हाण,किरण बनसोडे,संजय सुरवसे,गौतम मुळे,नागेश महाराज, रेणापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव रेणापूर शहराध्यक्ष मतीन अली सय्यद,सभापती उमाकांत खलंग्रे,उपसभापती शेषेराव हाके,हणमंत पवार,बाजार समिती संचालक जनार्दन माने,बाळकृष्ण खटाळ,विश्वनाथ कागले,सौ.पुजा इगे,स्वाती सोमाणी,निर्मलाताई गायकवाड,राजाभाऊ सांळुके, अल्पसंख्यांक शहरअध्यक्ष पाशाभाई शेख,खमरूद्दीन शेख,अकबर खुरेशी,नय्युम आत्तर,सय्यद मुजफ्फर,गौस फरीद,आयुब शेख,पदम पाटील,अनिल पवार,रामलिंग जोगदंड,ऍड.प्रशांत अकनगिरे,सचिन पुंडलिकराव इगे,उमेश सोमाणी,अजय चक्रे,विजयकुमार एकुरके,मुकेश राजे,हकीमभाई सय्यद,राजभाऊ शिंदे,दिपक पाटील,दिनेश पाटील, रंगनाथ इरले,अतुल गोकुळे,प्रदिप काळे,शहाजी कुरे,प्रा.सिदार्थ चव्हाण,संभाजी सुळ,प्रवीण पाटील, शिवाजी कांबळे,नितीन पाटील हरवाडीकर,ऍड.सुनील गायकवाड, राहुल लोंढे, मूनव्वर शेख, प्रा.शिवाजी मोहाळे,राहुल देशमुख,दीपक गायकवाड, रहीम शेख,कैलास माने यांच्यासह लातुर शहर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
