• Wed. May 14th, 2025

तर लोकशाही आणि निवडणुका संपतील, प्रणिती शिंदेंचं मोठं वक्तव्य

Byjantaadmin

Mar 21, 2024

सोलापूर, 21 मार्च 2024 : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदें हे सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर आहे. प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यंदा होणारी लोकसभा निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची निवडणूक असणार आहे. ही निवडणूक करो या मरो अशी ठरणार आहे. या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल इतंकच नाहीतर संविधानही संपून जाईल. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल आणि निवडणुका ही संपतील. आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी खेचून घेतील, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. मागच्या दहा वर्षात जी तुमची फसवणूक केली तीही पुढे करणार त्यांचे आमदार खासदार ही खोटारडे आहेत. दहा वर्षात भाजपने विश्वासघात केलाय माझ्याकडे काही कारखाने सोसायटी नाहीत त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *