• Wed. May 7th, 2025

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार?, कुणाला कुठून उमेदवारी?

Byjantaadmin

Mar 18, 2024

महाविकास आघाडीमधील)जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर येत असून, ठाकरे गटाला एकूण 22 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला होता. अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 22 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. ]

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने आता उमेदवारांना देखील प्रचारासाठी वेळ मिळायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. ज्यात उद्धव ठाकरेंना 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाची देखील उद्धव ठाकरेंकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

‘या’ जागांवर अजूनही निर्णय नाही…

उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत 22 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत देखील निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. असे असतांना 22 पैकी 4 अशा जागा आहेत, जिथे कोणता उमेदवार द्यायचा याबाबत निर्णय झाला नाही. ज्यात जळगाव, कल्याण, पालघर,  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सोबतच, हातकणंगले मतदारसंघात उमेदवार न देता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्राथमिक यादी…

  • buldhana -नरेंद्र खेडेकर 
  • yawatmal वाशीम – संजय देशमुख
  • हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर  
  • parbhani- संजय जाधव 
  • sambhajinagar चंद्रकांत खैरे  
  • dharashiv – ओमराजे निंबाळकर  
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे  
  • nashik – विजय करंजकर  
  • thane – राजन विचारे  
  • मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील 
  • मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
  • मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
  • मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर 
  • ratnagiri – विनायक राऊत 
  • raigad- आनंद गीते
  • sangli- चंद्रहार पाटील 
  • हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )
  • मावळ – संजोग वाघेरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *