गेली 3 महिने मातोश्री असेा की शिवसेना भवन असो शिवसेनेत प्रवेश सोहळे सुरू आहेत. एका विचाराने आणि जिद्दीने शिवसेनेत प्रवेश करताय, काही जण सोडून गेल्याने शिवसेना कधीही संपणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता असताना तर सर्व जण सोबत येत असतान, ती एक जग राहाटी असते. सत्यनारायण हा वेगळास भाग आहे, तर सत्तानारायण हा वेगळा भाग असून तो कुणाकुणाला पावतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना लगावला आहे. काही जणांना असे वाटते आहे की शिवसेना संपली आणि या संपलेल्या काळात तुम्ही आला आहात, मात्र शिवसेना संपलेली नाही ज्यांना असे वाटत होते की आम्ही म्हणजे शिवसेना होतो, तर लोकं संपलेली आहेत, केवळ ते जगजाहीर होणे बाकी आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव् ठाकरे म्हणाले की, मी म्हणजेच शिवसेना, मी नसतो तर हे काम झाले नसते असे काही काही नसते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार येत जात असतात, याचा अर्थ असा नाही की मी म्हणजे सगळे काही असा गैरसमज एकनाथ शिंदेचा झाला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव् ठाकरे म्हणाले की, 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र द्रोही यांच्या विरोधातील मोर्चा आहे. फूले- शाहू्ू-आंबेडकर आणि शिवरायाचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि त्यांचाच़ अपमान करणारा माणूस जर पंतप्रधानांचा बाजूला बसत असेल तर महाराष्ट्राने समजायचे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
महाराष्ट्राला कुणी वाली आहे?
उद्धव ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कुणी बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखे बोलत आहेत. आमचे मुख्यमंत्री निहून दिले तेवढेच बोलतात, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री काही ऐकत नाही सर्व काही बुडले तरी आपण शांत आहोत. हे सगळे सुरू असताना महाराष्ट्राला कुणी वाली आहे का नाही. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेते एकच आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री आवाज वाढवून बोलताय, केंद्रीय गृहमंत्र्यांचे ऐकायला तयार नाही? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. न्यायाच्या बाजूने कोण काही बोलणार का नाही असेही ठाकरेंनी म्हटले आहे.