• Wed. May 7th, 2025

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची लातुरात दुसरी शाखा सुरु

Byjantaadmin

Mar 17, 2024

रेणा साखर कारखान्याचा पुढाकार

 विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन/  ऑफलाइन मार्गदर्शन  देणार

लातूर – दिलीपनगर तालुका रेणापूर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना   स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय व्हावी या करिता माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमितजी  देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून प्रथम रेणा साखर कारखाना येथे पहिली शाखा  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय सुरू करण्यात आले त्याचा खूप मोठा फायदा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थांना झाला अनेकांनी ऑफ लाईन ऑनलाइन द्वारें या केंद्रांतून मार्गदर्शन घेतले आज या केंद्रातून दहा ते पंधरा विद्यार्थी परीक्षेत पास होऊन उच्च पदावर कार्यरत आहेत या स्पर्धा परीक्षा दुसरी शाखा लातूर येथे  सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय  कॅम्पस मध्ये सुरू करण्यात आली आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी केले आहे 

रेणा चे सामजिक दायित्व

 समाजातील होतकरू व आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असलेल्या व हुशार असूनही  महागडे शिक्षण व पुस्तके घेता येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी रेणा साखर कारखान्याच्या माध्यमातून सामजिक दायित्व  म्हणून मोठ्या प्रमाणावर सर्व सुविधा मोफत केंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत हे विशेष आहे शासकीय सेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही अनेक विद्यार्थी  स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करियर घडवीत असतात त्यात सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख  केंद्र निवाडा दिलीप नगर येथील केंद्रावर  विद्यार्थ्यांनी गतवर्षी विविध परीक्षेत यश संपादन केले आहे या यावर्षीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन  कोर्स  सुरू  झाले असून 

 ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या ग्रामीण व शहरी भागातच उपलब्ध व्हावी याकरिता  रेणापुर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना. दिलीप नगर,निवाडा.या परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू केलेले आहे. तसेच यावर्षी लातूर येथेही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव  या स्पर्धा परीक्षा केंद्राची दुसरी शाखा लातूर येथे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात सुरू केलेली आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा

सुसज्ज लायब्ररी ऑफलाईन ऑनलाइन सुविधा केंद्रात उपलब्ध

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात एम.पी.एस.सी राज्यसेवा पीएसआय/ एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन तसेच ऑफलाइन लेक्चर्स, महाराष्ट्रातील विविध विषयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, सुसज्ज वातानुकूलित वर्ग, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे असणारे समृद्ध ग्रंथालय तसेच व्यक्तिगत विकासावर भर व योग्य मार्गदर्शन या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादन केले आहे.  प्रत्येक बॅचसाठी दर आठ दिवसांनी ऑनलाइन + ऑफलाइन टेस्ट सिरीज  व त्याचे विश्लेषण, उत्तम योजनेसहित प्रशस्त स्वतंत्र व सुरक्षित, उत्तम शैक्षणिक यशदायी  वातावरण व आरामदायी बैठक व्यवस्था करण्यास आल्याची माहिती रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी दिली .

युपीएससी,एमपीएससी- राज्यसेवा, कम्बाईन  परीक्षा 2024, बँकिंग व सरळ सेवा भरती कोर्स सुरू

निवाडा व लातूर या दोन्ही केंद्रावर ( यु पी एस सी)  एम पी एस सी परीक्षा 2024, बँकिंग व सरळसेवा मधील सर्व बॅचेसचे कोर्स नि:शुल्क ऑनलाईन + ऑफलाइन बॅच सकाळी 11 ते 6 या वेगवेगळ्या वेळेत सुरू झालेले आहेत तरी गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क करून बॅचला जॉईन व्हावे. यासाठी संपर्क  प्रा. दिनेश नवगिरे केंद्र समन्वयक मोबाईल  9172161683/9175006567 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रेणा साखर कारखाना यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *