आपण केलेली विकासकामे लोकांपर्यंत घेऊन जा विजय काँग्रेसचा होणार-आमदार धीरज विलासराव देशमुख
काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला मोठा प्रतिसाद
लोकसभा निवडणुकीची आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी सुरू*
लातूर -आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभेसाठी पक्षाकडून काँग्रेस पक्ष जो उमेदवार येईल त्यांना निवडून आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. त्यासाठी आजवर केलेली काँग्रेसकडून जी विकासकामे झालेली आहेत ते उजळ माथ्याने लोकांपर्यंत घेऊन जावा त्यासाठी आपण स्वतः सकारात्मक विचार ठेवून आतापासून कामाला लागावे विजय आपलाच होणार आहे असा विश्र्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर तालुका व औसा तालुक्यातील २७ गावातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बूथ कमिटी कार्यकर्त्याचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

अच्छे दिन म्हणनाऱ्यानी १० वर्षांत काय केले-आमदार धीरज देशमुख यांचा सवाल
दहा वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या एन डी ए आघाडी ने अच्छे दिन आणतो म्हणून भूलथापा देऊन सत्तेवर आले मात्र लोकांचा भ्रमनिरास झाला महागाई वाढली गॅस डिझेल दरवाढ केली शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही नुसत्या घोषणा करतात प्रत्यक्षात काहीच नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या जून ते सोन ही जूनी म्हंन आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सोन्याचे दिवस (कोंग्रेसला) आणायचे आहेत त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ला निवडून द्या त्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या बूथ लेवलवर दक्ष राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान म्हणून राहूल गांधी ची गरज
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा लातूर लोकसभा निरीक्षक रामहरी रुपनवर यांनी अशा प्रकारचे मेळावे राज्यभरात सर्व काँगेसच्या सर्व आमदारांच्या मतदार संघात घेण्याची गरज असून आमदार धीरज देशमुख यांचे कौतुक करीत या मेळाव्यातून ऊर्जा नवा विश्र्वास देण्याचे काम होत आहे यातून नक्कीच पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून द्या देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान म्हणून राहुलजी गांधी यांना बसवण्याची गरज आहे त्यासाठी आपण आतापासून कामाला लागावे अधिक मतदान करण्यासाठी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक भिसे जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेनापूरचे सभापती उमाकांत खलंग्रे यांची समयोचीत भाषणे झाली व्यासपिठावर रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख,लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर शहर जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष अँड कीरण जाधव, चंद्रचुड चव्हान शेषराव हाके,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अनुप शेळके, यांच्यासह रेणापूर तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश नवगिरे यांनी मांडले