• Thu. May 1st, 2025

अवघ्या 24 तासात भाजपचे दोन खासदार काँग्रेसच्या गळाला! लोकसभा निवडणुकीपूर्वीच तगडा झटका

Byjantaadmin

Mar 11, 2024

चुरूचे भाजप खासदार राहुल कासवान (Churu MP Rahul Kaswan) यांनी आज (11 मार्च) भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंदर सिंह यांचा मुलगा हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी सुद्धा रविवारी भाजपमधून राजीनामा दिला. बिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अवघ्या 24 तासात भाजपला तगड झटका बसला आहे. यापूर्वी दिल्लीतील दोन भाजप खासदारांनी राजकाणालाच रामराम केला आहे.

काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारलेले कासवान म्हणाले की, त्यांना पक्षात आवाज ऐकला जात नाही, असे वाटले. सत्तेच्या विरोधात लढलेल्या अशा लोकांची पक्षाला गरज आहे, असे सांगत खरगे यांनी काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत केले. राहुल कासवान काँग्रेसमध्ये सामील झाल्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो. सरंजामी लोकांविरुद्ध लढणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पाठिंबा देणारे राहुल कासवानकाँग्रेस पक्षात सामील झाले याचा मला आनंद झाल्याचे खरगे म्हणाले. 

दुसरीकडे, भाजपचे हरियाणातील लोकसभा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनीही रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ब्रिजेंद्र सिंह म्हणाले की, दोन ऑक्टोबर रोजी जींदच्या रॅलीत एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि हरियाणातील भाजप-जेजेपी युतीबाबत निर्णय घेण्यात आला. भाजप सोडण्यामागे तेही एक कारण आहे.

काँग्रेसशी जुने संबंध

ब्रिजेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध आहे. कुलदीप बिश्नोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह यांचे तिकीट रद्द होण्याची शक्यता होती. याशिवाय जेजेपी युतीमुळेही ब्रिजेंद्र सिंह भाजपवर नाराज होते.

कोण आहेत ब्रिजेंद्र सिंग?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दुष्यंत चौटाला आणि भव्य बिश्नोई यांचा पराभव करून हिसारमधून विजय मिळवला. माजी नोकरशहा आणि प्रसिद्ध शेतकरी नेते छोटू राम यांचे ते पणतू आहेत. त्यांचे वडील बिरेंद्र सिंह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आणि आई प्रेमलता सिंग यांनी उचाना विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.

ब्रिजेंद्र सिंग हे लोकलेखा समिती आणि संरक्षणविषयक स्थायी समितीचे सदस्यही आहेत. ते माजी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत, त्यांनी 21 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. 1998 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत 9 वा क्रमांक मिळविला. ब्रिजेंद्र सिंह यांनी जेएनयूमधून आधुनिक इतिहासात एमए केले आहे. ते मुळचे हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *