• Wed. Apr 30th, 2025

पवनराजेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांनी मला पदरात घेतलं, उपकार कधीच विसरणार नाही, ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना शब्द

Byjantaadmin

Mar 7, 2024

धाराशीव: माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मला पदरात घेतले. त्यावेळी ते म्हणाले होते की, पद्मसिंह वगैरे काही सांगू नको, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही माझ्यावर कायम प्रेम केले. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यासाठी मी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे. 40 आमदार शिवसेना सोडून गेले असले तरी आमच्या शिवसैनिकांमध्ये 80 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, असे वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केले. उमरग्यात गुरुवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत ओमराजे निंबाळकर यांनी भाषण करताना लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयाची हमी दिली.

Omraje Nimbalkar fiery speech at Omerga during Uddhav Thackeray rally at Dharashiv Maharashtra Omraje Nimbalkar:  पवनराजेंच्या हत्येनंतर बाळासाहेबांनी मला पदरात घेतलं, उपकार कधीच विसरणार नाही, ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना शब्द

मी आतापर्यंत जितक्या लोकांसोबत सेल्फी काढले आहेत तेवढी मतं मला पडली तरी हा आकडा 6 लाखांच्या घरात जातो. मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो. मध्यंतरी एका महिलेने एसटीत सीट मिळत नाही, म्हणून मला फोन केला होता. तिने कंडक्टरला फोन दिला तेव्हा ओमराजे निंबाळकर बोलतोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. शेवटी मी व्हीडिओ कॉल केला तेव्हा कुठे त्याचा विश्वास बसला. त्यानंतर त्या महिलेला एसटीत बसायला जागा मिळाली, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला वर्गणी उचलून येथील लोकांनी तीनवेळा आमदार केले. मराठा, धनगर आरक्षणासाठी लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार मी होतो.  आम्ही कुठेही गेलो की, लोक आमच्याकडे स्वाभिमानाने बघतात. 40 आमदार शिवसेना सोडूने गेले तरी त्याचे 80 आमदार करण्याची ताकद येथील शिवसैनिकांमध्ये आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये: ओमराजे निंबाळकर

तुम्हाला सोयाबीनला 11 हजार रुपये भाव पाहिजे काय? मग’जय श्रीराम’ची घोषणा द्या. नोकऱ्या पाहिजेत तर मग ‘बजरंगबली की जय’ची घोषणा द्या. अशा घोषणा देऊन सोयाबीनचा भाव वाढणार आहे का किंवा तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या लोकांना एका मतासाठी 50 हजार रुपये देण्यात आले. पण आपले लोक हलले नाहीत. उलट त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या उमेदवारांना खर्च करण्यासाठी दिले, असे  ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *