शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा औसा विधानसभा दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिनांक 7 मार्च रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघापासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा करत आहेत त्या अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात केली जाणार आहे. दिनांक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता संभाजीनगर येथून लातूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.या नंतर 12:20 वा. बुधोडा येथे स्वागत, 12:30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यात सभा घेण्यात येणार आहे या सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना ,किल्लारी , नाईचाकूर मार्गे कासारसिरसी येथे स्वागत आहेत
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख दिनकर माने, बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटक सौ जयश्री उटगे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे