जळगाव: पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो. पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे. तुम्ही त्या 50 वर्षांचा सोडा पण साध्या पाच वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या. मग मोदींच्या 10 वर्षांचा हिशेब मागा, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. अमित शाह हे सध्या दोन दिवसांसाठी MAHARSHTRA च्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मध्ये आयोजित करण्यात सभेत शरद पवारआणि उद्धव ठाकरे ) यांना घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केले.

ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. असे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का, असा सवाल अमित शाह यांनी विचारला. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना) पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे, ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. मग या सगळ्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे? तुमच्यासाठी कोणी असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, असे अमित शाह यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
देशाच्या भविष्यासाठी, विकासासाठी मोदींना पंतप्रधान करा: अमित शाह
शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायभरणी शिवाजी महाराजांनी केली. 2024 च्या निवडणुकीबाबतीत बोलण्यासाठी आलोय. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे या गैरसमजात राहू नका. 2027 ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मत आहे. पुलवामामध्ये आतंकवादी आले, 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. ही मोदी गॅरंटी आहे. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही? 370 कलम 70 वर्षे काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले त्यांनी 370 कलम हटविले. राहुल गांधी म्हणत होते कलम 370 हटवले तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. पण रक्ताचे पाट सोडा, काश्मीरमध्ये एक दगड उचलण्याची हिंम्मत कुणाची झाली नाही, असे अमित शाह यांनी म्हटले.