• Tue. Apr 29th, 2025

लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक म्हणून डॉ. सुरेखा मुळे सोमवारी रुजू

Byjantaadmin

Sep 28, 2022

लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक म्हणून डॉ. सुरेखा मुळे सोमवारी रुजू

लातूर( जिमाका ) येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालाच्या अधिनस्त लातूर विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) डॉ. सुरेखा मुळे यांनी आज पदभार स्विकारला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रकाशित केलेली” वैभवशाली लातूर जिल्हा पर्यटन पुस्तिका ” व पुष्पगुच्छ देवून डॉ. सुरेखा मुळे यांचा सत्कार केला.
यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील अशोक माळगे, श्रीमती विशाखा शेंडगे, श्रीमती मनिषा कुरुलकर,जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विवेक डावरे, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर कोंपले, अशोक बोर्डे, व्यंकट बनसोडे यासोबतच विभागीय माहिती कार्यालयातील रामकिशन तोकले, प्रवीण बीदरकर, बालाजी केंद्रे, शेख कलीम आदिंची यावेळी उपस्थित होते.
उपसंचालक (माहिती) डॉ. सुरेखा मुळे यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी, अर्थमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी यासोबतच विविध विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे तसेच अनेक दैनिकाच्या स्तंभलेखक, अर्थसंकल्प या विषयावर विशेष अभ्यास, महिला सबलीकरण या विषयावर लेखन केले आहे. डॉ. सुरेखा मुळे या गेल्या 24 वर्षापासून मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाच्या विविध विभागात कार्यरत होत्या.
लातूर विभागाच्या उपसंचालक म्हणून त्यांच्या अधिनस्त लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed