• Tue. Apr 29th, 2025

भाजपच्या काळातील गृहखात्याने संविधानच खुंटीला टांगले; माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवेंची टीका

Byjantaadmin

Mar 3, 2024

(Congress) काळातील गृह खाते आणि आताच्या भाजपच्या (BJP) काळातील गृह खाते यात जमीन-आसमानचा फरक आहे. आम्ही संविधान आणि राज्यघटना याचा आदर करून काम करायचो. आता संविधानच खुंटीला टांगलेला असून संविधानाच्या विरोधातच सर्व काम चालू आहे. सोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावल्या गेले असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवें यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. सध्या कोणी सरकारच्या विरोधात बोलले तर इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा धाक दाखून एक तर पक्षात ये, नाहीतर जेल मध्ये टाकू. असे तोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. हा काँग्रेस आणि भाजप मधील फार मोठा फरक असून राज्यात गुंडशाहीचे राजकारण सुरू असल्याची घणाघाती टीका देखील रमेश बागवे यांनी भाजपवर केली आहे. 

पोलीस खाते झोपले आहे का? 

विद्येचे माहेर घर असलेले सुसंस्कृत पुण्यामध्ये मधल्या काळात कोयता गॅंगचा सुळसुळाट होता. त्यापाठोपाठ आता त्याच पुण्यात मोठ्या प्रमात ड्रग्सचे मोठे घबाड उघडकीस आले आहे. त्याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय टोळीशी जुळला असल्याने राज्यसह पुण्याचे नाव देखील बदनाम झाले आहे. हे सर्वप्रकार आज गृहखात्याच्या बेजवाबदारपणामुळे होत आहेत. गृहखाते ज्यांच्याकडे आहे, त्यांचे याकडे आजिबात लक्ष नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे म्हणत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनीDEVENDRA FADNVIS यांच्यावर आरोप केले आहे. पुण्यात आज देशभरातून शिक्षण, निकरीसाठी तरुणाई येत असते. मात्र आज त्या पुण्यात ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या घटना घडत आहे. असे असतांना ससून रुग्णालयात एका ड्रग्स माफियाल कशी वागणूक देण्यात येते, म्हणजे पोलीस खाते झोपले आहे का, असा प्रश्न देखील रमेश बागवे यांनी उपस्थित केला. आमच्यावेळी गृहखात्यावर आमचे पूर्ण नियंत्रण होते. कोणी असे दोषी आढळून आल्यास आम्ही तत्काळ शासन केल्या जात होतो. मात्र आताच्या गृहखात्याचे हे अपयश असल्याने अशा प्रकार घडत असल्याचे देखील रमेश बागवे म्हणाले. 

तीन इंजिनच्या सरकारमुळे दोन जातीमध्ये तेढ  

मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची पण इच्छा आहे. पण राज्यात असलेलं तीन इंजिनचं सरकार हे दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांनी मोठ-मोठे आश्वासन दिले. आम्हाला सत्ता द्या आम्ही मराठा आरक्षण देऊ. सोबतच धनगर, मुस्लिमांना देखील आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कुणाला आरक्षण मिळाले नाही. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण या सरकारने दिली पाहिजे. अशी आमची भूमिका असल्याचे देखील रमेश बागवे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed