अॅड. रूद्राली पाटील – चाकूरकर यांचा विवाह थाटात संपन्न
लातूर /प्रतिनिधी- देशाचे माजी गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष व पंजाबचे राज्यपाल श्री. शिवराज पाटील चाकूरकरांची आणि डॉ. अर्चना पाटील व श्री. शैलेश पाटील यांची ज्येष्ठ कन्या अॅडव्होकेट रूद्राली पाटील यांचा विवाह मध्य प्रदेशातील इंदोरचे जिल्हाधिकारी आयएएस श्री.मनीष सिंह यांचे सुपत्र कुशाग्र सिंह यांचा विवाह 25 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थान मधील अल्वर जिल्हातील तिजारा फोर्ट येथे मोजके पाहुणे व मित्रांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश श्री. शिवराज पाटील (बेंगलोर ) मा. श्री. गुलामनबी आजाद, केंद्रीय मंत्री श्री. भगवंत खुब्बा, राजस्थानचे गृहमंत्री, माजी मंत्री श्री. बसवराज पाटील, श्री. प्रदीप राठी, प्रा. श्री. बी. व्ही. मोतीपवळे, श्री. राजेश्वर बुके इत्यादी मोजके मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते.

यानंतर भोपाळ येथे स्वागत समारोह 27 फेब्रुवारी रोजी झाला. या स्वागत समारोहास मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्यप्रेदशचे मुख्य सचिव इकबाल सिंह इत्यादी आणि अनेक आयएस व आयपीएस अधिकारी उपस्थित होते. भोपाळ येथे स्वागतसमारोहाचेवेळी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गाडी पार्क करून जवळपास एक किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. अशी स्थिती होती.
