सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असं खुलं आव्हानMANOJ JARANGE PATIL यांनी उपमुख्यमंत्री DEVENDRA FADNVIS यांना दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
बारस्कर हा फडणवीसांनीच उभा केलाय
ते पुढे म्हणाले की, बारस्कर हा फडणवीस यांनीच उभा केलाय. मीडियावर दबाव टाकला जात आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत.
मी कोणत्याही पक्षाचा नाही
छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा कुणाचा तरी डाव आहे. यातDEVENDRA FADNVIS यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.
…तर फडणवीसांना आयुष्यातून उठवणार
माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी शोधल्या जात आहेत. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछाड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही. फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो. तू गनिमा कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार असे जरांगे म्हणाले.