• Tue. Apr 29th, 2025

तरुणी ट्रग्जच्या नशेत…, पुण्यातील व्हिडीओने राज्यात खळबळ

Byjantaadmin

Feb 25, 2024

पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा पकडण्यात आल्याची चर्चा होत असतानाच एका नव्या व्हिडीओ खळबळ उडाली आहे. ड्रग्ज घेऊन नशेत तर्रर्रर्र झालेल्या दोन कॉलेजवयीन तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एकच खळबळ उाडील आहे. अभिनेता रमेश परदेसीने नशेत टुल्ल झालेल्या तरुणींचा व्हिडीओ केला आहे. 

पुणे सध्या चर्चेत आहे, ते ड्रग्जचा मोठा साठा सापडल्यामुळे. शहरात तब्बल ११ कोटी रुपयांचे ६०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. मिठाच्या पिशव्यांमध्ये हे ड्रग्ज भरलेले होते. या घटनेवर चिंता व्यक्त होत असतानाच एक नवीन घटना समोर आली आहे. 

पुण्यातील व्हायरल व्हिडीओत काय?

अभिनेता रमेश परदेसी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओत दोन तरुणी दिसत आहे. एक तरुणी नशेत दिसत आहे. ती काहीतर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी तरुणी तिच्या बाजूला पडलेली आहे. अति नशा केल्यामुळे ती पूर्णपणे शुद्ध हरपून गेल्याचे दिसत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed