• Wed. Apr 30th, 2025

लातूर शहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचना

Byjantaadmin

Feb 24, 2024

लातूर शहरातील आगीच्या घटनेतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अपतग्रस्तांना धीर

लातूर शहरातील साळे गल्ली परिसरात सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ६० फुटी रस्त्यावरील ६ दुकानांना काल रात्री आग लागून मोठे नुकसान झाले, आग लागल्यासंबंधी माहिती मिळताच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून त्वरित आग आटोक्यात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, याप्रसंगी संबंधित दुकानदाराशी संपर्क साधून त्यांनाही धीर दिला आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी  या आगीच्या घटनेच्या घटनेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अपदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल विभाग व तहसीलदारांना दिल्या आहेत, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपतग्रस्तांना धीर देऊन त्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावे या दृष्टीने प्रयत्न करण्यासही सांगितले होते,

आज सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड किरण जाधव पक्षाचे पदाधिकारी इनुस मोमीन, तबरेज तांबोळी, महेश काळे, करीम तांबोळी, पिराजी साठे, जाफर शेख यांनी  ज्यांची दुकाने जळाली आहेत ते शेख फैयाज हुसैन, सैयद शहाबुद्दीन शूजाउद्दीन, तंबोली शकील सुदबोद्दीन,  पठान इरफान शब्बीर, इमरान गोसोद्दीन पटवेकर, रहीम अमीर शेख  यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. महसूल विभागाचे नायब तहसीलदार, भीमाशंकर बेरूळे मंडळ अधिकारी,राम झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत, या पदग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा आगीच्या घटना घडू नयेत यासाठी महसूल महापालिका पोलीस प्रशासनाने सजग रहावे, त्यासंबंधी जागृतीसाठी उपाययोजना कराव्यात, नागरिक व दुकानदार यांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, व्यापारी प्रतिष्ठाने  व उद्योगाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून घ्याव्यात असे आवाहनही मी  करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed