मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांची बुधवारी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. सिद्दिकी यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या पक्षांतरामुळे झिशान सिद्दिकी हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज ना उद्या पक्ष सोडतील याची भिती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसने बुधवारी सिद्दिकी यांना हटवून त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
Zeeshan Siddiqui removed from the the post of Mumbai Youth Congress President.
— ANI (@ANI) February 21, 2024
Earlier this month, Zeeshan Siddiqui's father Baba Siddiqui left Congress and joined Ajit Pawar faction NCP.
(File Photo) pic.twitter.com/7BKBCUaqbd
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी यासंदर्भातील घोषणा केली. मुंबई युवक काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून, कार्याध्यक्षपदी सुफियान मोहसीन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.