जागृती साखर कारखान्याकडून अवघ्या २७ दिवसात १ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
२८ दिवसांत को जनरेशन च्या माध्यमातून ४० लाख ४९ हजार १०० युनिट वीज निर्मिती
कारखान्याकडून पहिल्यांदाच कमी दिवसात उसाचे विक्रमी गाळप तर वीज निर्मिती मध्ये उच्चांक
देवणी:- तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीज ने २०२२- २३ मधील चालु गाळप हंगामात केवळ २७ दिवसांत १लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत कारखान्याने आतापर्यंतचे दहा वर्षातील गाळपाचे सर्व विक्रम मोडत नवीन उच्चांक गाठला आहे तर कारखान्याने २८ दिवसांत को जनरेशन च्या माध्यमातुन ४०,४९,१०० युनिट वीज महावितरण कंपनीकडे एक्सपोर्ट केले असून हे दोन्ही नवीन विक्रम कारखान्याने चालु हंगामात करून साखर उद्योगात भरारी घेतली आहे राज्याचे माजी मंत्री संस्थापक दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जागृती शुगर साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या जिल्ह्यातील जागृती शुगर साखर कारखान्याने गरुड झेप घेतली आहे
राज्याच्या खाजगी साखर कारखानदारीत देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखाना एफ आर पी पेक्षा अधिक भाव देण्याचा विक्रम याच कारखान्याने केलेला आहे त्यामुळे जागृती शुगर साखर कारखान्याच्या चालु गाळप हंगामात जास्तीत जास्त उसाचे गाळप कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जागृती शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी यावेळी बोलताना सांगितले