• Wed. Apr 30th, 2025

अखेर ठरले, आयपीएल भारतात की दुबईत निर्णय झाला, कधीपासून सुरु होणार सामने

Byjantaadmin

Feb 21, 2024

लोकसभा निवडणुकीमुळे इंडियन प्रीमियर लीगचेipl

स्पर्धा कुठे होणार ? यासंदर्भात संदिग्धता होती. भारत किंवा दुबईत स्पर्धा घेण्याचा पर्याय समोर ठेवला होता. परंतु या स्पर्धा कुठे होणार यासंदर्भातील माहिती ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘आयपीएल’च्या १७व्या सत्राचा कार्यक्रम कधी सुरु होणार आहे, त्याची माहिती त्यांनी दिली आहे. या स्पर्धा भारतातच होणार असल्याचे धुमल यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धा य़ेत्या २२ मार्चपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

IPL 2024  | अखेर ठरले, आयपीएल भारतात की दुबईत निर्णय झाला, कधीपासून सुरु होणार सामने

लोकसभा निवडणुकीमुळे असा बदल

लोकसभा निवडणुकांच्या तारखा मार्च माहिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीचा केवळ १५ दिवसांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात बोलताना धुमल म्हणाले की, आयपीएलची सुरुवात २२ मार्चपासून करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या तारखांकडे लक्ष ठेवत आहोत. आयपीएल भारतातच होणार आहे. जूनमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना २६ मेला होण्याची शक्यता आहे.

२००९ मध्ये असे झाले होते

लोकसभा निवडणुकांमुळे २००९ मध्ये ‘आयपीएल’चे संपूर्ण सत्र दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पार पडले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांदरम्यान आयपीएल भारतातच झाल्या. यंदाह या स्पर्धा दुबईत होण्याची चर्चा होती. आयपीएलचा पहिला सामना गतविजेता आणि उपविजेतामध्ये होतो. यामुळे यंदाही पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *