निलंग्यात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
एक गंभीर उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हालविण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पोलिस प्रशासनास अहवाल
निलंगा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात सगे सोय-याची वंशावळीचा तात्काळ सरकारने निर्णय घ्यावा यासाठी गेल्या तीन दिवसापासून बसलेले अमरण उपोषणकर्ते माधव वाडीकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना तात्काळ लातूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात यावे असा अहवाल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यानी दिला आहे.सध्या चिंताजनक प्रकृती असलेल्या उपोषणकर्त्यास उपोषणाच्या ठिकाणीच उपचार सुरू केला आहे.

ईश्वर पाटील,किरण पाटील,सतिश फट्टे,राहूल बिराजदार,वैभव गोमसाळे,यांच्या पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.