आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन
मुंबई (लालबाग-परळ-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
आर्यारवी एंटरटेनमेंट यंदा प्रथमच “नँशनल शाँर्टफिल्म फेस्टीवल” चे आयोजन करण्यात आले असून. या फेस्टीवलमध्ये भारतातील कुठल्याही भाषिक शाँर्टफिल्म्स पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी शाँर्टफिल्म्स वगळता इतर भाषिक शाँर्टफिल्म्सना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या शाँर्टफिल्म फेस्टीवलमध्ये जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ च्या दरम्यान चित्रित झालेल्या शाँर्टफिल्म्सच भाग घेवू शकतात. या फेस्टीवलमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन शाँर्टफिल्म्सना भरघोस रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देवून प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. शिवाय ईतरही वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असून भाग घेणाऱ्या सर्व शाँर्टफिल्म्सना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक श्री.महेश्वर तेटांबे
(संपर्क – 9082293867), श्री.अनंत सुतार
(संपर्क – 8879296636), श्री.सुरेश डाळे
(संपर्क – 8355891218) आणि श्री.मनिष व्हटकर
(संपर्क – 9969920828) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.