दोनशे किलो वजन आणि आठ फुट लांब असलेल्या मगरीला निलंगा येथे केले जेरबंद
निलंगा :- शहरातील संजय हलगरकर यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये अचानक मगर( असल्याचे आढळून आले त्यानंतर त्यानी तात्काळ पोलिस प्रशासनास फोनवर माहिती दिली पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सेजाळ यानी घटनास्थळी जाऊन मगर() असल्याची खाञी केली आणि वनविभागाला) कळविले. त्यांनतर वनविभागाचे वनरक्षक बडगीरे यानी तालुक्यातील राठोडा लांबोटा येथील सर्पमिञ प्राणीमिञाना तात्काळ बोलावून घेतले हलकृर यांच्या शेतात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी जवळपास तीन तास जीकरीचे प्रयत्न करावे लागले होते.

दोनशे किलो वजन आणि आठ फुट लांब असलेल्या या महाकाय मगरीला जेरबंद करून वनविभाने घेऊन गेल्यानंतर शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. सदरील शेततळ्याच्या बाजूला लागूनच घरे असल्यामुळे काही काळ भितीचे वातावरण शहरात पसरले होते. सर्वच घरातील नागरिक आपली घराची दारे बंद करून बसली होती.