मृद्ध शेतकरी अभियानातून शेतकऱ्यांना मिळत आहेत आधुनिक शेतीचे धडे!
निलंगा, : आधुनिक शेती व शेतीपद्धतीविषयी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती देऊन त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने निलंगा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या पुढाकारातून निलंगा, देवणी, आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांमध्ये ‘समृद्ध शेतकरी अभियान २.०’ राबविण्यात येत आहे. कृषी विभाग व कृषी तज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विविध कृषी योजना व आधुनिक शेतीचे धडे दिले जात असून शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.

अभियानाच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये गावोगावी माहिती शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी तज्ञ व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, विविध कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण, पीएम कृषी सिंचाई योजना, शेततळे व शेततळ्याचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, रो हाऊस, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदाचाळ, मल्चिंग, पॅकहाऊस, नैसर्गिक, सेंद्रिय व गट शेती, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पोकरा यांसह विविध विषयांची माहिती दिली जात आहे.
अभियानाची माहिती तसेच आगामी काळात शिबिरे आयोजित करण्यात आलेल्या गावांची नावे व वेळापत्रक मा. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या सोशल मिडिया पेजेसवर प्रसारित करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपापल्या गावात होणाऱ्या या शिबिरांची माहिती घेऊन त्यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
शेतीची योग्य पद्धत समजल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल – मा. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब
योग्य तंत्रज्ञान आणि शेती पद्धतीचा वापर केल्यास कमी क्षेत्रामध्ये जास्त पिक घेतले जाऊ शकते. जगभरात याचे अनेक यशस्वी प्रयोग झालेले आहेत. आपल्याकडे शेतकरी बांधवांना शेतीच्या आधुनिक पद्धतींविषयी अधिक माहिती नसल्यामुळे त्यांना अपुरे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांना याविषयी माहिती दिल्यास त्यांचे उत्पन्न खात्रीशीरपणे वाढू शकते. गेल्या दीड वर्षांपूर्वी अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. शेतकरी बांधवांच्या अत्यंत सकारात्मक प्रतिसादामुळेच हा दुसरा टप्पा राबविला जात असून सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
अभियान संपन्न झालेल्या गावांची नावे (१३ फेब्रुवारी पर्यंत) –
निलंगा तालुका : नणंद, औराद शा., दापका, मानेजवळगा, मन्नतपुर, शेळगी, जाऊ, अंबुलगा बु., शिरोळ, वांजरवाडा, वळसांगवी, बसपुर, हाणमंतवाडी अ.बु., सावरी, माकणी, ताडमुगळी, सिंधखेड, केळगाव, होसुर, नदीवाडी, चिंचोडी, राठोडा, कंलाडी, हंचनाळ, खडक उमरगा, हंगरगा, लांबोटा, काटेजवळगा, शिरसी हं, जाजनुर, गुऱ्हाळ, झरी, आनंदवाडी, शिऊर, दादगी.
शिरूर अनंतपाळ तालुका : शिरुर अनंतपाळ, धामनगाव, तुरुकवाडी, नागेवाडी, आनदंवाडी, कारेवाडी, चामरगा, बोळेगाव, येरोळ, पांढरवाडी, डिगोळ, सुमठाणा, दैठणा, साकोळ, तळेगाव दे., आजणी, तिपराळ, कानेगाव, होनमाळ, शेदं(उदप), शिवपुर, जोगाळा, लक्कड जवळगा, रापका, थेरगाव.
देवणी तालुका : देवणी, विळेगाव, डोंगरेवाडी, इंद्राळ, वडमुरंबी, अजनी, वागदरी, गुरधाळ, चवणहिप्परगा, नागतिर्थवाडी, दरेवाडी, बोंबळी, हेळंब, धनगरवाडी, हिसामनगर, महादेववाडी, आंबानगर, देवणी खु., आनंदवाडी, बोरोळ, भोपनी, मानकी, नागराळ, धनेगाव, इस्लामवाडी, जवळगा, देवणी बु., कोनाळी, शिवाजी तांडा, गौंडगाव, होनाळी, सावरगाव, सय्यदपुर, सिंधीकामठ, बटनपुर.