येणाऱ्या हंगामात मांजरा परिवारातील साखर कारखाने ६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार
५८ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून दीड हजार कोटी रुपये एफआरपी सहीत उस उत्पादक शेतकऱ्यांना देणारा मांजरा परिवार राज्यात पहील्या स्थानावर
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती
रेना साखर कारखान्याची २० वी सर्व साधारण सभा संपन्न
लातूर :-विश्वासाने तुम्ही आम्हाला पदावर बसवले असून त्या पदाचा उपयोग तुमच्या स्वप्न साकार करण्यासाठी आम्हीं प्रयत्न करत असून पुढील २० वर्षाच्या काळात हा भाग समृध्दी विकासाचा वेग असलेला दिसेल असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाचे गाळप पुर्ण करण्याचा जो शब्द दिला होता तो तंतोतंत पाळलेला आहे आगामी हंगामात मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातुन ६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचें आमचे उद्दिष्ट असल्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी यावेळी सांगितले ते दिलिपनगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेणा साखर कारखान्या च्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते
रेणा साखर कारखान्यांच्या माध्यमातुन आर्थिक सुबत्ता मिळाली
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की रेणापुरकरांचे कष्टाचे मोल जाणून हक्काचा त्यांच्या हक्काचा एक कारखाना असावा या भावनेतून लोकनेते विलासराव देशमुख यांनी रेणा साखर कारखान्याची उभारणी केली.व त्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधत या भागातील लोकांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी मोठा हातभार लावला आहे असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडे,राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन श्रीशैल उटगे,संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय साळुंके, बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक मारुती पांडे, बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, अनिता केंद्रे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, ,रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, मांजरा साखर कारखान्याचे एमडी जितेंद्र रणवरे, जिल्हा बँकेचे एम डी एच जे जाधव, व संत शिरोमणीचे एम डी रविशंकर बरामदे, जागृतीचे सर व्यवस्थापक गणेश येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उसाला अधिक भाव पश्चिम महाराष्ट्र च्या पुढें मांजरा परिवाराचा
आमदार धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
काळाची गरज ओळखून अनेक शेतकरी ऊसतोड यंत्र खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लातूर जिल्हा बँक कर्ज देण्यासाठी पुढे आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील आहे. ऊस तोडणी यंत्रा मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. मांजरा कारखाना परिवारातील साखर कारखान्यांनी पश्चिम महाराष्ट्राला देखील मागे टाकून साखर उद्योगात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता आपली स्पर्धा ही जगाशी असून या स्पर्धेत देखील आपले साखर कारखाने यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्व विषयांचे वाचन कार्यकारी संचालक बीव्ही मोरे यांनी केले
रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी प्रास्ताविकात रेणा कारखान्याच्या वाटचालीचा आढावा सभेपुढे सादर केला. सर्व साधारण सभेपुढील सर्व विषयांना टाळ्याच्या गजरात सभासदांनी मंजुरी दिली.
यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक भिसे,यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील व अभय साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सहकार नेतृत्व पुरस्कार पुरस्कार मिळाल्या बद्दल दिलीपरावजी देशमुख साहेबांचा रेणापूर तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठया प्रमाणावर सत्कार केला कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संचालक प्रवीण पाटील यांनी केले
यावेळी सर्वाधिक ऊस पुरवठा दारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेस कारखान्याचे सन्माननीय संचालक मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी, उस उत्पादक शेतकरी सभासद नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
_______________________
दिलीपराव देशमुख यांच्या सत्कारासाठी व्यासपिठावर रीघ
संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात संस्थेचा देश पातळीवरील सहकारातील मार्गदर्शक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यासाठीं रीघ लागलेली दिसत होती पंढरपूर विठ्ठलाला जशी गर्दी असते तशी गर्दी सत्कार सोहळ्यात शेतकऱ्यांचे विठ्ठल अशी उपमा लोक सभास्थळी चर्चा करत होते ते वास्तव्य चित्र बघायला मिळाले.