• Mon. May 5th, 2025

माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

Byjantaadmin

Feb 10, 2024

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहे. nashik जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री EKNATH SHINDE यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *