• Mon. May 5th, 2025

पंतप्रधान पक्षाचा नव्हे, देशाचा असतो! – शरद पवार

Byjantaadmin

Feb 8, 2024

नवी दिल्ली : पंतप्रधान देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचे काम केले. पण, नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीमध्ये अधिकार महत्वाचे असतात, चुकीला चूक म्हणता आले पाहिजे. चुकीचा कार्यक्रम असो, चुकीचं काम असो, चुकीला विरोध केला पाहिजे. मी आज एक तास पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं. मोदींच्या भाषणात समाजात एकता निर्माण व्हावी, यासाठी काहीही नव्हतं. मोदींच्या भाषणात केवळ विनोद होते. पंतप्रधान देशाचे असतात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचे काम केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणून दिवंगत नेत्यांवर टीका करणे योग्य नाही. मोदींचे भाषण ऐकून मला दु:ख झाले. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे. नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे, असेही पवार म्हणाले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून असहिष्णुता वाढली जात असून आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल.

बेरोजगारी वाढली असल्याने वैफल्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. या मुद्द्यावर काम करावं लागेल. विद्यापीठांमध्ये धार्मिक धुव्रीकरणाचा वर्ग तयार केला जात असल्याचे आपण पाहात आहोत. याची सुरुवात दिल्ली विद्यापीठात झाली. आता दिल्लीपर्यंत हे मर्यादित राहिलं नसून पुणे असो किंवा मुंबई, याठिकाणी या घटना घडत आहेत. या धर्मांध शक्तींविरोधात एक जबरदस्त संघटन आपल्याला तयार करावं लागेल. जे सुरू आहे, ते अतिशय वाईट असल्याची टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *