• Thu. Jun 19th, 2025

मोफत मधुमेह,रक्तदाब, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर

Byjantaadmin

Feb 8, 2024

निलंगा- लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेल,ग्रामपंचायत कार्यालय, सोनखेड. साई क्रिटिकेअर हॉस्पिटल,निलंगा .यांच्या संयुक्त विद्यमाने  व डॉ.अरविंद भातांब्रे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज श्री साईबाबा मंदिर सोनखेड ता.निलंगा येथे मोफत मधुमेह,रक्तदाब, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात श्री साई बाबा च्या दर्शनाने करून,सोपान काका धुमाळ यांनी प्रस्तावना केली व गावकऱ्यांच्या वतीने डॉ.अरविंद भातांब्रे साहेब,डॉ.स्नेहा कांबळे व सर्व स्टाफ चा सत्कार करण्यात आला ,त्या नंतर गावकऱ्यांना डॉ.साहेबांनी मधुमेह,रक्तदाब, आदी आजारावर सखोल अस मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये 420 रुग्णांनी सहभाग नोंदवला.त्या मध्ये 40 मोतीबिंदू  रुग्णांची नोंदणी झाली व 220 रूग्णांना चष्मे लागले. 

 शिबिरामध्ये तज्ञ डॉ.अरविंद भातांब्रे ,डॉ.स्नेहा कांबळे, राहुल गावकरे, ज्योती पाटील,प्रकाश खंदपुरे,भैरवनाथ तुरे, विनायक थोरमोटे,ऋषी लोभे यांनी गावकऱ्यांची सेवा केली . आज पर्यंत डॉक्टर अरविंद भातांब्रे यांच्याकडून6500 चष्म्याचे वाटप झाले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना शिबिरे पार पडत असताना हॉस्पिटलच्या माध्यमातून 75 वर्षांपुढील रुग्णांना मोफत दवाखाना आहे .आणि महिलांना मोफत तपासणी करण्यात आली आहे. या वेळी सोपान काका धुमाळ,लिंबाजी पाटील,शेषेराव सोळुंके,अमोल पाटील,बाळू पाटील,दुषंत पाटील,गोविंद सोळुंके,संभाजी पाटील,अशोक एकमबे,जटिंग सोळुंके,काशिनाथ सोळुंके,उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *