• Thu. Jun 19th, 2025

मांजरा साखर कारखान्याच्या हार्वेस्टर तोडणी व व्यवस्थापनाची जत येथील श्रीपती शुगर्स कडून पाहणी

Byjantaadmin

Feb 7, 2024

मांजरा साखर कारखान्याचे श्रीपती शुगर्स कडून कौतुक

लातूर

देशात हार्वेस्टर तोडणी यंत्राचा वापर करून उस तोडणी करून वेगळा पॅटर्न राबवणारा लातूर येथील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास पश्चीम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत येथील श्रीपती शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी कारखाना स्थळी भेट देऊन हार्वेस्टर व प्रशासकीय यंत्रणेची पाहणी केली समाधान व्यक्त केले तत्पूर्वी  कारखाना स्थळी लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, श्रीपती शुगर्सचे अध्यक्ष महेंद्रअप्पा लाड उपस्थित होते .

यावेळी कारखाना स्थळी जत बाजार समितीचे संचालक शशिकांत पवार, पतंगराव कदम सोसायटीचे संचालक विक्रम लाड, जत सोसायटीचे चेअरमन अशोक लाड, उपाध्यक्ष सतीश पवार,संचालक सचिन सावंत, आज्ञान पांढरे, पोपट लाड, जनरल मॅनेजर महेश जोशी, चिप इंजिनियर यशवंत जाधव, तसेच मांजरा साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते

मांजरा चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रीपती शुगर्स काम करेल

राज्यात नावलौकिक असलेल्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान वाटचाल करीत असलेल्या मांजरा साखर कारखान्यास भेट देऊन हार्वेस्टर द्वारें उस तोडणी व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली अतिशय सुंदर नियोजन करून उस उत्पादक शेतकऱ्यांना कमी कालावधीत हरवेस्टर द्वारें उसाची तोडणी व प्रशासकीय कामाची पाहणी केली त्यावेळीं ते बोलत होते यापुढे आम्हाला मांजराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करू असे सांगून मांजरा साखर परिसर व येथे असलेले लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचे स्मृती स्थळ व परिसर सुशोभित करून एक चांगला साखर कारखाना म्हणून राज्यात मांजरा साखर कारखान्याचा नावलौकिक मिळवला आहे पुढेही राहील असा विश्वास श्रीपती शुगर्स चे अध्यक्ष महेंद्रअप्पा लाड यांनी यावेळी बोलून दाखवला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *