मातोश्री पानंद रस्त्याच्या ९६ लक्ष निधी कामाचे उदघाटन-आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नातून चार किलोमीटर शेतरस्ते होणार
निलंगा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंञी आमादार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या मातोश्री पानंद रस्ते योजनेतील ९६ लक्ष निधीतून चार किलोमीटरचे शेत रस्ते होणार असून याचे उदघाटन करण्यात आले आहे.दिनांक ७ रोजी निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील मशामाय देवस्थानकडे जाणारा चिचोंडी रस्ता ते नदिवाडी रस्ता दोन किलोमीटर ४८ लक्ष व अंबुलगा ते हंगरगा जाणारा रस्ता २४ लक्ष आणि शिऊर रस्ता ते आनंदवाडी २४ लक्ष रूपये असे एकून ९६ लक्ष निधीतून शेतीकडे जाणारे चार किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी सोईचे होणार आहेत.या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता.याविषयी शेतकऱ्यांनी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे मागणी करताच तात्काळ शासन स्तरावर आदेश देवून आमदार निलंगेकर यानी सदरील रस्ते मंजूर करून घेतले आहेत.याचा मोठा फायदा आता या परीसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

अंबुलगा बु गावचे सरपंच स्वाती शिंदे,चेअरमन अरविंद चव्हाण यांच्या हस्ते मातोश्री पानंद रस्त्याचे उदघाटन करण्यात आले असून यावेळी माजी.प.स.सदस्य सुभाष म्हेञे,माजी प.स.सदस्य वामनराव भालके,माधव पाटील,शेखर मिरगाळे,गुंडेराव बिरादार,नरसिंग म्हेञे,माधव पिटले,सत्यवान शिंदे,रावसाहेब आंबेगावे,दशरथ गोडगे,बालाजी शिंदे,चक्रधर बिरादार,बाळासाहेब बिरादार,बाबुस सुर्यवंशी,अमर सुर्यवंशी,बब्रूवान सुर्यवंशी,माधव बिरादार,किरण शिंदे,संदीप पाटील,उमेश होरे,सत्यवान सुर्यवंशी आदिसह शेतकरी व गावातील नागरिक उपस्थित होते.