युवकांनो भविष्याचा वेध घेत चला-अशोकराव पाटील निलंगेकर
देवणी-देवणी येथे अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने कर्मयोगी स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त देवणी प्रीमियर लीग चे क्रिकेट स्पर्धा 2024 सदर सामन्यांचे उद्घाटन समारंभ निलंगा मतदार संघाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव पाटील निलंगेकर व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.श्री.दिलीपराव पाटील नागराळकर,कृ.उ.बा.स.मा.सभापती गोविंदराव भोपणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,ग्रामीण व शहरी भागातील युवकांच्या सांघिक कौशल्यास चालना मिळावी आणि त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने देवणी शहरामध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.युवकांच्या कलागुणांना वाव हा कुठेतरी थांबल्यागत झाल्याने त्यांना ऑफलाइन खेळाच्या माध्यमातून सक्रिय करावे हाच या स्पर्धेमध्ये उद्देश आहे आजच्या या डिजिटल युगात आपले भविष्याचा युवकांनी वेध घेत चालावे आणि अभ्यासू राहावे असे सांगून त्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या देवणी प्रीमियर लीग मध्ये एकूण 110 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून देवणीच्या नगराध्यक्षा कीर्तीताई घोरपडे, उपनगराध्यक्ष अमित मानकरी,प्रदेश सचिव युवक काँग्रेस गजानन भोपणीकर,अशोकराव पाटील मित्र मंडळ जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, सं.गां.निराधार कमिटीचे अध्यक्ष वैजनाथ लुल्ले,डीसीसीचे निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे,मा.सरपंच बाबुराव लांडगे,मा.सरपंच देविदास पतंगे, पाणीपुरवठा सभापती नदीम मिर्झा, नगरसेवक महादेव मळभागे,काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष जाफर मोमीन, नगरसेवक योगेश ढगे,काँग्रेस शहराध्यक्ष जावेद तांबोळी,माजी नगरसेवक जावेद येरोळे,अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष शेख इस्माईल सर,काँग्रेस युवा नेते अश्विन लांडगे,शिवाभाऊ कांबळे, अक्षय शिंदे,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सादक खुरेशी, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष जावेद सय्यद,देवणी तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस शरण लुल्ले,देवणी शहराध्यक्ष इरफान सय्यद,युवक एस.सी.सेल शहराध्यक्ष रितेश सूर्यवंशी तसेच देवणी तालुक्यातील सर्व आजी-माजी सदस्य,पदाधिकारी,शहर कार्यकारिणी,कार्यकर्ते,युवक,मोठया संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास पतंगे व अजय भातम्बरे,अजय तुळजापुरे,माजिद मोमीन,मन्सूर शेख व अशोकराव पाटील मित्र मंडळ,देवणी यांनी परिश्रम घेतले.