• Tue. Apr 29th, 2025

दाक्षिणात्य अभिनेता विजयने सुरू केला राजकीय पक्ष:तमिलागा वेत्री कळघम ठेवले नाव

Byjantaadmin

Feb 2, 2024

अभिनेता विजय 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याने लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. विजय म्हणाला की, आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे.

चित्रपटात काम करत राहीन, पण राजकारणात येऊन तामिळनाडूच्या जनतेची सेवा करणार असल्याचेही विजयने सांगितले.

विजयचे तामिळनाडूमध्ये प्रचंड चाहते आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर 10.5 दशलक्ष आणि ट्विटरवर 4.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा गरजू लोकांना मदत करताना दिसतो.

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे. तो त्याच्या आगामी ‘थलापथी 65’ या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेत आहे. फीच्या बाबतीत त्याने ‘दरबार’साठी 90 कोटी रुपये घेतलेल्या रजनीकांतलाही मागे टाकले आहे.

बालकलाकार म्हणून सुरू झाली कारकीर्द
विजयचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. तो चाहत्यांमध्ये थलपथी म्हणून प्रसिद्ध आहे. विजयचे वडील एसए चंद्रशेखर हे कॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजयने त्याच्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 6 चित्रपटांमध्ये तो बालकलाकार म्हणून दिसला आहे.विजय हा रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे आणि त्याने 1985 मध्ये आलेल्या ‘नान शिवपू मनिथन’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांच्यासोबत काम केले होते.वयाच्या 18 व्या वर्षी विजयने नलय्या थेरपू या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे नाव विजय होते. या नावाने त्याने 8 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1992 मध्ये ‘नलाईया थेरपू’ हा सरासरी चित्रपट ठरला, पण यानंतर विजयने एकापाठोपाठ तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. विजयने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत सुमारे 65 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.त्याची आई शोभा चंद्रशेखर यांच्याप्रमाणेच विजयदेखील एक उत्कृष्ट गायक आहे. ‘थुप्पाक्की’ चित्रपटातील त्याने गायलेले ‘गुगल गुगल’ हे गाणे खूप गाजले. या गाण्यासाठी विजयला मोस्ट पॉप्युलर तामिळ गाण्याचा पुरस्कारही मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed