• Mon. Apr 28th, 2025

पाच वर्षांत महाराष्ट्राने गमावले दहा लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार पदावर असतानाच अखेरचा श्वास

Byjantaadmin

Jan 31, 2024

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रातून जवळपास दहा लोकप्रतिनिधींनी पदावर असताना अखेरचा श्वास घेतला. २०१९ ते २०२४ या काळात महाराष्ट्राने सात आमदार, तर तीन खासदार गमावले आहेत. यामध्ये शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराचा समावेश होता. तर काँग्रेसने दोन खासदार आणि भाजपने एक खासदार गमावला.

२०१९ ते २०२४ काळात निधन झालेले महाराष्ट्रातील आमदार-खासदार

आमदार

राष्ट्रवादी – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे करोनामुळे निधन

काँग्रेस – देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा करोना संसर्गानंतर अखेरचा श्वास

काँग्रेस – कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

शिवसेना (ठाकरे गट) – अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांची दुबईत हार्ट अटॅकने प्राणज्योत मालवली

भाजप – चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा कर्करोगाने मृत्यू

भाजप – पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी झुंज अपयशी

शिवसेना (शिंदे गट) – खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन

खासदार

काँग्रेस – हिंगोलीतील राज्यसभा खासदार राजीव सातव यांचा करोनामुळे मृत्यू

भाजप – पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन

congress – BALU DHANORKAR CHARADAPUR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed