“भूक लागल्यावर जेवण जितके गरजेचे तितके वाचन महत्वाचे” चि.पुलकेशी भोसले.इयत्ता पाचवी.
निलंगा प्रतिनिधी…..
मराठी भाषा पंधरवाडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने आज महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे विद्यार्थी बालवाचक संवाद आयोजित केला होता.या बालवाचक संवादात साने गुरुजी ने सुरु केलेल्या साधना या साप्ताहिकाचा निवडक बालकुमार साधना या शिर्षकाचा दिवाळी विषेशांक मराठी साहित्यात अतिशय महत्वाचा मानला जातो. यात २००८ ते २०१७ या दहा वर्षातील ३६ बालकथा चा समावेश आहे. साने गुरुजी मुलासाठी संस्कार क्षम साहित्य निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे महाविद्यालयातील मुलांना बालसाहित्यातील अनुभवाची माहिती व्हावी म्हणून आज बालवाचक संवादाचे आयोजन मराठी विभागाने केले होते.
या बालवाचक संवादात संवादक म्हणून इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या पुलकेशी हंसराज भोसले यांनी बालकुमार साधना मधील खालील निवडक कथेवर अतिशय सुंदर मांडणी केली.
१.डोंगरातील शाळा -अनिल अवचट,
२.ज्ञानेश तू कुठे आहेस – विवेक सांवत,
३.नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेले भाषण – मलाला युसूफ झाई,
४.मोठे होत असलेल्या मुलांनो – अनिल काकोडकर,
५.कामावर जाणारा आठ वर्षाचा मुलगा – डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम,
६.आई आठवताना – रघुनाथ माशाळकर,
७. वामन भटजी ची गाय – साने गुरुजी
८. मोर्चा, टी शर्ट – राजन गवस
९. जवळ तरीही किती दूर – मिल्खा सिंग
१०. राग – कैलास सत्यार्थी
या निवडक बालकथेवर पुलकेशी भोसले यांनी अतिशय सुंदर भाष्य केले. समारोप करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूक लागल्यावर जेवण जितके महत्वाचे तितकेच वाचन देखील महत्वाचे. या विधानाचा संदर्भ देऊन आणि
‘एक शिक्षक, एक विद्यार्थी, एक पेनशील आणि एक वही जग बदलू शकते’. या नोबेल पुरस्कार प्राप्त विजेत्या मलाला युसूफझाई यांच्या विधानाने केला.
सुरुवातीला पुलकेशी चे मराठी विभागाच्या वतीने दयना बनफुल आणि त्यांना सावलीत वाढवू नका – ही दोन पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील भाषा विभागातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. आर. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात बाल वाचक संवादक म्हणून पुलकीशीने केलेल्या मांडणीचे कौतुक केले आणि शुभेच्या दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. बी. एस. गायकवाड, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. ए. एम. मुळजकर, डॉ. हंसराज भोसले, प्रा. मनीषा घोगरे, प्रा. मनीषा वारद, डॉ. विजय कुलकर्णी, प्रा आत्राम हे उपस्तित होते.
या वाचक संवादातून आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या पुलकेशीचे स्टेज धाडस, बोलण्याची शैली, कधी कश्याचा वापर कसा करायचा,कधी संदर्भ वाचून बोलायचे यातून कॉलेज च्या विद्यार्थ्यांना ही प्रेरणा मिळाली.
आजचा वाचक संवाद दोन्ही अर्थानी खुप छान झाला.कार्यक्रमाचे निवेदन संचालन डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यानी केले तर आभार प्रा. डॉ. हंसराज भोसले यांनी मानले.
