लातुर – शहरातील न्यु काझी मोहल्ला येथील रूकय्या बेगम ऊर्दू गर्ल हायस्कूलमधील सहशिक्षीका प्रा. नाजेमा अब्बास शेख यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने दि. २७ जानेवारी रोजी परभणी येथे झालेल्या समारंभात खासदार फौजीया तहसीन खान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. नाजेमा अब्बास शेख गेल्या 27 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमासह वृक्षारोपण, सांस्कृतिक उपक्रम,समाजकार्य व समाजहितासाठी कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या पुरस्कार वितरण समारंभास एम. एम. गफ्फार महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षण संघटना अध्यक्ष मोहम्मद गौस झैन, शिक्षणाधिकारी संजय ससाने, गट शिक्षणाधिकारी सुभान आम्ले, सा. मुस्लिम विकास परिषद संपादक अब्दुल समद शेख यांची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल प्रा. नाजेमा अब्बास शेख यांचे प्रा. डॉ. अफसर बाबा शेख, रूकय्या बेगम उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक कसेरी आदींनी कौतुक केले.
