• Wed. Apr 30th, 2025

आंदोलन संपवलं नाही, स्थगित करतोय; अखेर मनोज जरांगेंनी सरकारला ‘खुटी’ मारलीच

Byjantaadmin

Jan 27, 2024

(Maratha Protest) लढ्याला अखेर यश आलं आहे. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया (Manoj Jarange Patil) यांनी दिली आहे(Maharashtra Goernment) कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. सगेसोयऱ्यांसाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे. मुख्यमंत्री यांनी चांगलं काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

मराठा समाजासाठी आज दिवाळी

”मराठा समाजाचा लढा यशस्वी ठरल्याने आज मराठा समाजाची दिवाळी असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाज खूप आनंदी आहे, यापेक्षा आणखी काय हवं. मराठा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. इथंपर्यंत आलो ही मेहनत, ताकद वाया नाही गेली, याचं समाधान आहे. गोदा पट्ट्यांतील 123 गावांनी खूप साथ दिली, संबंधmaharashtra तील मराठा समाज पाठीशी उभा होता, म्हणून हे यश मिळालं आहे,” असं जरांगे म्हणाले आहेत.

मुंबईकडे कूच करण्याआधी आरक्षणाचा अध्यादेश

मनोज जरांगे यांनी वाशीतील विजयी रॅलीदरम्यान सांगितलं की, “मराठा समाज mumbai कडे निघताच सगेसोयऱ्यांचा आदेश निघाला आहे. हा विजय माझा नसून सर्व मराठा समाजाचा आहे. सर्व गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हा विजय मराठा समाजाचा आहे. मराठा समाजासाठी अध्यादेश निघणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत देखील आदेश निघाला आहे. शिंदे समिती पुन्हा कुणबी नोंदी शोधण्याचा काम करणार आहे.”

गुलालाची उधळण, मराठा बांधवांनी डिजेवर धरला ठेका

मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याचा आनंद आता गावागावात साजरा व्हायला लागलाय. पुण्यातील लोणावळ्यात जिथं मुंबईत दाखल होण्यापूर्वी विराट सभा झाली होती, तिथं ही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केलाय. गुलालाची उधळण करत, डीजेच्या तालावर इथं जरांगे समर्थकांनी ठेका धरलाय. गाणी मात्र जरांगेंवर आधारितचं वाजत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed