माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर शिष्टमंडळाने घेतली भेट
100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे दिले निमंत्रण
लातूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रात १०० वे नाट्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान १०० वे विभागीय नाट्य संमेलनाचे केले जाणार आहे. यासंदर्भातील निमंत्रण देण्यासाठी आलेल्या नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नाट्य संमेलनाचे आयोजन त्याचबरोबर लातूर येथील सांस्कृतिक चळवळीच्या संदर्भाने चर्चा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेचे शंभरावे विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २४ दरम्यान लातूर
येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या नाट्यसंमेलनाचे निमंत्रक पद स्वीकारणे व परिसंवादात सहभाग घेण्याचे निमंत्रण शिष्टमंडळाने त्यांना देऊन नाट्य परिषदेच्या विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महानगर शाखा अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखा अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, संजय आयचित, धनंजय बेंबडे, डॉ. मुकुंद भिसे, अजय गोजमगुंडे, सुबोध बेळंबे, अमोल गोवंडे, आदीसह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूरचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
