जागृती शुगरच्या चालु गाळप हंगामातील उत्पादित १ लाख २५ हजार ०१ साखर पोत्याचे कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पूजन
देवणी ;तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज ने २०२२- २३ च्या चालु हंगामात २२ दिवसात ७८४४० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून उत्पादित झालेल्या १ लाख २५ हजार १ साखर पोत्याचे पूजन मंगळवारी साखर कारखाना स्थळी जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले (देशमुख) यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी जागृती शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे,कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती
कारखाना स्थळी जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवीताई भोसले, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली पाहणी
कारखाना स्थळी सुरू असलेल्या उस गाळप, वजन काटा, आसवनी प्रकल्पाला भेट दिली तेथील कामाची पाहणी केली तसेच काही सूचना केल्या समाधान व्यक्त केले तत्पूर्वी कारखाना स्थळी असलेल्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन तेथे मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली तसेच लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती स्थळी जावून अभिवादन केले
यावेळी मांजरा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, मीडिया समन्वयक पत्रकार हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, वृक्षमित्र सुपर्ण जगताप, बालाजी साळुंखे जागृती शुगर चे विविध विभागाचे खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते