IFFI 2022″: ‘काश्मीर फाईल्स’ प्रपोगंडा चित्रपट, महोत्सवात आलाच कसा? परीक्षकांची नाराजी
बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली. केवळ सोशल मीडियावरील मार्केटींग स्टॅट्रजीनं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रवृत्त केले. असे ज्या चित्रपटाच्याबाबत म्हटले जाते त्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरील वाद अजुनही थांबलेले नाहीत.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो गोव्याच्या यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये. आज त्या चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. त्यावेळी परिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यापैकी एका परीक्षकानं बिनधास्तपणे काश्मीर फाईल्स हा प्रचारकी चित्रपट असल्याचे सांगून अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सव हा नेहमीच चर्चेत असणारा महोत्सव आहे. जगभरातून हा महोत्सव पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. अभ्यासकही येतात. अशावेळी जगभरातील सिनेप्रेमींसाठी, रसिकांसाठी हा महोत्सव नेहमीच वेगळ्या पर्वणीचा विषय ठरला आहे. आता तर शेवटच्या दिवशी महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि चेअरमन नदाव नफिल यांनी व्यक्त केलेलं मत हे सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
काश्मीर फाईल्स हा चित्रपट इफ्फीच्या महोत्सवात आलाच कसा, तो या महोत्सवामध्ये येणं ही मोठी धक्कादायक बाब आहे. याचे कारण म्हणजे तो एक प्रचारकी चित्रपट आहे. काश्मीर फाईल्स ही प्रपोगंडा फिल्म आहे. असे नदाव यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर नदाव यांच्यावर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.