कासार बालकुंदा येथील शांताबाई नायब यांचं निधन
निलंगा/प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील शांताबाई सुधाकरराव नायब यांचे दि.१६ जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कासार बालकुंदा येथील गुरव समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कै.शांताबाई नायब या कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे अत्यंत विश्वासू, महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड मुंबई चे माजी संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन कै. सुधाकरराव यशवंतराव नायब यांच्या पत्नी, निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक योगेश नायब यांच्या व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. रंजनाताई इंद्रजीत आचार्य यांच्या आई, कासार बालकुंदा गावच्या सरपंच प्रभावती नायब यांच्या सासुबाई तर औराद शहाजानी जिल्हा बँकेचे शाखा तपासणीस वैभव नायब यांच्या आजी होत्या. यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.