भाजपा उद्योग आघाडी सेलच्या तालुकाध्यक्षपदी रमेश सातपुते यांची निवड
………..
निलंगा, ता. १० : निलंगा तालुका भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी सेलच्या तालुकाध्यक्षपदी रमेश नारायण सातपुते यांची नुकतीच निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध तालुका स्तरीय आघाडी व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उद्योग आघाडीची जबाबदारी श्री. सातपुते यांच्यावर देण्यात आली आहे. श्री. सातपुते यांचा निलंगा तालुक्यासह उद्योगाच्या माध्यमातून मोठा संपर्क आहे. बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करणे, केंद्र व राज्यसरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचवणेसाठी प्रयत्न करावे करावे लागणार आहेत. या निवडीबद्दल माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, निराधार समिती अध्यक्ष शेषराव ममाळे, दगडू सोळूंके यांनी अभिनंदन केले आहे