टेम्पो-कार अपघातात माजी नगराध्यक्ष निटुरे यांचे पुत्र शिवप्रसाद निटुरे यांचा मृत्यू
लातूर प्रतिनिधी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील औसा तालुक्यातील आशिव शिवारातील आशिव पाटी येथे दि ९ जानेवारी रोजी पहाटे ५़३० वाजण्याच्या समारास टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा शिवप्रसाद राजेश्वर निटुरे यांचा मृत्यू झाला.
शिवप्रसाद निटुरे सोलापूरहून लातूरकडे येत होते. आशिव पाटी जवळ एमएच २४ एएस १६०० या क्रमांकाच्या भाजीपाला वाहतूक करणा-या टेम्पोची निटुरे यांच्या कारला धडक बसली. त्यात शिवप्रसाद निटुरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. कारमध्ये शिवप्रसाद निटुरे यांच्यासोबत त्यांचे मामा होते. ते किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते़ शिवप्रसाद निटुरे यांनी लंडन येथून एमबीए केले होते. शिवप्रसाद निटुरे यांच्या पार्थिवावर दि. १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राज राजेश्वरी मंदीर परिसर मल्लापूर उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.