• Wed. Apr 30th, 2025

जाऊ गावच्या उपसरपंचासह ग्रा.प.सदस्यांचा भाजपात प्रवेश

Byjantaadmin

Jan 7, 2024
जाऊ गावच्या उपसरपंचासह ग्रा.प.सदस्यांचा भाजपात प्रवेश
भाजपा युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जाऊ गावच्या उपसरपंचासह सर्वच  ग्राम पंचायत सदस्य  आणि शेकडो मुस्लिम  तरूणांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.
निलंगा/प्रतिनिधी
माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  निलंगा तालुक्यातील जाऊ येथील विद्यमान उपसरपंच ग्राम पंचायत सदस्यासह  शेकडो तरूणांनी दिनांक ७ रोजी भाजपा जन संपर्क कार्यालय येथे भाजपात प्रवेश केला आहे. चेअरमन दगडू सोळुंके,संजय गांधी निराधार समितीचे नुतन अध्यक्ष शेषराव मंमाळे,शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी जाऊ ग्राम पंचायतचे पॕनल प्रमुख मैसुफ़ यूनुस पटेल,मेहराज महमद हुसैन – तहांमुक्ती अध्यक्ष,उपसरपंच मसुद चाँदपाशा पटेल,ग्रा.प.सदस्य इमरान ईसाखान पठान ,साजिद युनूस पटेल,समरीनबीन सद्दाम पटेल,साबेर इलाईसाब  पठान,अमन मुजीब पटेल,फयाज हसन शेख,हज्जू हमीद पटेल, शेख इमरान समद सोहेल जावेद पटेल, मुदद्दशीर जावेद पटेल,आफ्रोज निसार शेब,रिहान चाँदपाशा शेख,
साबेर शोखत शेख,शफीक  आयूब पटेल,समिर दौलासाब  शेख, सुलतान सलाऊद्दिन शेख,जब्बार हूशेन शेख,महेबुब इस्माइल  मुल्ला, यजाज ईलाई बक्स पठाण,कैफ अल्ताफ पटेल आदि  शेकडो मुस्लिम  तरूणांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *