• Wed. Apr 30th, 2025

अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देताना काळजी घ्या, या व्यक्तीला लिफ्ट देणे आले अंगलट

Byjantaadmin

Jan 6, 2024

रस्त्यावर आपण अनेकांना लिफ्ट देत असतो. एकमेकांना मदत करणे हा चांगला उद्देश असतो. परंतु एका व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच अंगलट आले. त्या व्यक्तीला काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या पलावा-खोणी जवळ तीन जणांनी मिळून लुटले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे, लिफ्ट द्या असे सांगून त्याच्या कारमध्ये बसले. आपण वाशी जात नसल्याचे सांगितल्यावर ते कारमध्ये बसले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून चालकाच्या जवळील रोख रक्कम काढून घेतली. चालकाला जबरदस्तीने कारमधून ढकलून तिघे लुटारू कारसह फरार झाले. या प्रकरणी मानपाडाpolice  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. “नेकी कर दरिया में डाल” या हिंदी म्हणीप्रमाणे हा प्रकार घडला.  या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

काय घडला प्रकार

मुंबई येथील धारावीत राहणारे सचीन फुलचंद शाव (20) हे त्यांच्या कारने काटई-बदलापूर रोडने दुपार जात होते. यावेळी पलावा-खोणी भागातून जात असताना सचिन याला तीन जणांनी हात दाखवून थांबविले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे, असे बोलून तिघे कारमध्ये बसले. त्यांनी आपण वाशी येथे जात नसल्याचे सांगितल्यावरही ते तिघे जबरदस्तीने बसले. कारमध्ये बसल्यानंतर त्यातील एकाने चाकूचा धाक दाखविला. जास्त आवाज केला तर तुला भारी पडेल, अशी धमकी दिली. मात्र कारचा ताबा सोडण्यास तयार नसल्याचे पाहून तिघा लुटारूंनी सचिन शाव यांना बेदम मारहाण केली. त्यातील एकाने त्यांना जबरदस्तीने कारमधून उतरवून स्वतः कारचे स्टिअरिंग ताब्यात घेतले.

रोख रक्कम आणि ऐवज नेला

सचिन शाव यांच्या जवळ असलेलेी दीड हजार रूपये रोख रक्कम त्यांनी नेला. तसेच त्यांची कार असा एकूण 2 लाखांहून अधिक रकमेचा ऐवज घेऊन लुटारू पसार झाले. या प्रकरणी सचिन शाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे आणि त्यांचे सहकारी लुटारुंचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *