संजय गांधी निराधार कमिटीच्या अध्यक्षपदी शेषराव मंमाळे
निलंगा/प्रतिनिधी निलंगा संजय गांधी निराधार कमिटीच्या अध्यक्षपदी शेषराव मंमाळे यांची निवड करण्यात आली असून दहा सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
शासकीय सचिव म्हणून निलंगा तालुक्याचे तहसिलदार व शासकीय सदस्य म्हणून गटविकास अधिकारी हे अधिकृतरित्या संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य राहतील एकून बारा सदस्यांची ही कमिटी अधिकृतरित्या लातूरचे पालकमंञी गिरीश महाजन यांच्या शिफारशीवरून जिल्हा अधिकारी वृषा घुगे ठाकुर यानी जाहीर केली आहे.लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या संजय गांधी निराधार कमिट्या स्थापन केल्या होत्या परंतु बहू प्रतिक्षेत असलेली निलंगा कमिटी तालुक्याच्या संजय गांधी समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली होतीअखेर जाहीर झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून शेषराव मंमाळे,तर अशासकिय सदस्य हरी काळे,सुरेखा काळे,परमेश्वर धुमाळ,रवि कांबळे,माधव मरे,अमृत बसवदे,किशोर लंगोटे,बास्कर बिरादार,उत्तम लासूने यांची निवड कृरण्यात आली आहे.या निवडीबद्दल माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,अरविंद पाटील निलंगेकर,भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,शिंदे गटाचे शिवाजी माने,सुधीर पाटील,विनोद आर्य,हरीभाऊ सगरे,चेअरमन दगडू सोळुंके,संजय दोरवे,नरसिंग बिरादार,शिवकुमार चिंचनसुरे,लालासाहेब देशमुख,शाहूराज थेटे,राम काळगे,अप्पाराव सोळुंके,सुमित इनानी,कमदकिशोर अट्टल शफीक शेख आदिने नुतन कमिटीचे अध्यक्ष सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.