• Wed. Aug 6th, 2025

लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यास प्राथमिकता देणार – संजय शेटे

Byjantaadmin

Jan 2, 2024

लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यास प्राथमिकता देणार – संजय शेटे
लातूर : आगामी काळात लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करून तळागाळातील नागरिकांपर्यंत शरदचंद्र पवार यांचे विचार पोहोचविण्यास आपण प्राथमिकता देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी केले. लवकरच आपण जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित करणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संजय शेटे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेते – पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी संपन्न झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय शेटे आपले विचार व्यक्त करत होते. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने , प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, बापूसाहेब पाटील, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम, राधाकिशन तेलंग, शेख, सुभाष पवार, मदन काळे, व्यंकट पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत घार, निशांत वाघमारे, प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, रामराजे आत्राम, युवती अध्यक्ष स्नेहा मोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना नूतन जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी आपण सर्वप्रथम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित निर्णयावर भर देणार असल्याचे सांगितले. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची विचारधारा सर्वसामान्यांच्या मनात पक्की विराजमान झालेली आहे. मात्र जिल्ह्यात आजपर्यंत राष्ट्रवादीचे प्राबल्य म्हणावे तेवढे वाढू शकले नव्हते. त्याची कारणमीमांसाही आपण पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसमवेतच्या चर्चेत केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेस एक मजबूत राजकीय पार्टी म्हणून पुढे आणण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे शेटे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आपण लातूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीबद्दल आपली मते मांडली. मान्यवरांनी त्यांच्या मताची नोंद करून घेतली. यावेळी उपऱ्या कार लक्ष्मण माने यांनी वंचितांचे कैवारी शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे युवकांची ताकद उभी करण्याचे आवाहन केले. बस्वराज पाटील नागराळकर यांनी शरद पवारांची मजबूत विचारधारा हेच राजकीय ताकतीचे सूत्र आहे असे सांगितले. माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी अहमदपूरसह उदगीर विधानसभा ताकतीने जिंकण्याचा निश्चय आहे व त्यासाठी सर्वानी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीचे सूत्र संचालन एड. इरफान शेख यांनी तर आभार प्रदर्शन परमेश्वर पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *