• Mon. Apr 28th, 2025

निलंगा विधानसभा लिडरशीप डेव्हलपमेंट व मतदार संपर्क अभियान समन्वयकपदी अभय साळुंके

Byjantaadmin

Jan 1, 2024

निलंगा विधानसभा लिडरशीप डेव्हलपमेंट व मतदार संपर्क अभियान समन्वयकपदी अभय साळुंके
निलंगा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत असून पक्ष बळकटीकरण, बुथ व ग्राम कमिटी गठण करण्यासाठी काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व माजीमंत्री आ. अमित देशमुख यांच्या सुचनेवरुन काॅग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके यांची निलंगा विधानसभा लिडरशीप डेव्हलपमेंट व मतदान संपर्क अभियान समन्वयकपदी निवड करुन महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. निवडीचे पत्र माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी प.स सभापती अजित माने, तालुका कार्याध्यक्ष अँड नारायण सोमवंशी, चेअरमन प्रमोद मरूरे, गंगाधर चव्हाण, दिनकर बनसोडे अदि उपस्थित होते. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवित आगामी काळात निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात दौरा करून पक्षवाढीसाठी व बुथ रचना, ग्राम कमिटी गठण अदी कामे युद्धपातळीवर करुन पक्षाची ताकद भक्कमपणे वाढवून पुन्हा एकदा निलंगा तालुका काँग्रेसमय करुन दाखवू असा विश्वास यावेळी अभय साळुंके यांनी व्यक्त केला. निलंगा विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहीला असून माजी मुख्यमंत्री स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागच्या दहा वर्षांपासून निलंगा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. आगामी काळात परत एकदा काॅग्रेसचा झेंडा मतदारसंघावर फडकविण्यासाठी काॅग्रेस पक्षाने कंबर कसली असून काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांना त्या दृष्टीनेच लिडरशीप डेव्हलपमेंट व संपर्क अभियान समन्वयक पदाची जबाबदारी दिली. मागच्या पाच वर्षांत आक्रमक व्यक्ते म्हणून अशी ओळख निर्माण केलेले अभय सोळुंके यांच्यावर पक्षाने दिलेल्या जबाबदारीची त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्व व संघटन कौशल्याच्या बळावर जबाबदारी चोख बजावली आहे. सांगली जिल्ह्य़ाचे सहप्रभारी, कर्नाटक व तेलंगना विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून सोपवलेले जबाबदारी त्यांनी सार्थ करुन दाखवली त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed